Saturday, 20 November 2021

संयम



मनासी घालूनी कुंपण
राखा हो सर्वांनी संयम ||
संयम असावा क्रोधावर
अन् वखवखणाऱ्या लोभावर
संयम असावा आचरणावर
अन् नर-नारीतील भेदावर
मनासी घालूनी कुंपण
राखा हो सर्वांनी संयम ||
संयम असावा एक पत्नीव्रत श्री रामासम
संयम असावा मीरेच्या भक्तीसम
अन् श्री हनुमानाच्या शक्तीसम
मनासी घालूनी कुंपण 
राखा हो सर्वांनी संयम
तरच सुखी होईल जीवन
हाच असे जगण्याचा नियम ||

सौ.राजश्री सुहास जाधव.


8 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर संदेश आहे रचनेत...👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  4. संयम...सुखी जीवनाचा आरसाच! सुंदर लिहिलंय!✍️👌👌👌

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...