शब्द ते दाटले
डोळे आज पाणावले
भाव अंतरीचे पुन्हा
पेटून उठले
गौण समजून मुलीस
अस्तित्व तिचे नाकारले
घाव होऊनी हृदयी ते डसले
मुलामुलींच्या भेदात सारे फसले
ना भाव कधी तिच्या मनीचे जाणले
घेण्यास उत्तुंग भरारी,
ना पाठबळ कधी तिला मिळाले
शिक्षण घेऊनही अखेरीस,
चूल, मूल आणि संसारातच तिला गुंतवले
काय तर म्हणे !
' हेच आहे संस्कार आपले '
तेच आम्ही तुला दिले
राख त्याचे भान तू पहिले
ऐकून हे सारे
मन माझे गहिवरले
शब्द ते दाटले
डोळे आज पाणावले.......
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर रचना ✍️✍️🙏🏼🙏🏼
ReplyDelete1no.
ReplyDeleteखूप छान सुंदर अप्रतिम रचना
ReplyDeleteक्या बात है..!
ReplyDeleteखरंच वाचताना आमचेही पावले..!
खूप छान मांडलय 👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
खूपच भावनिक शब्द
ReplyDeleteअप्रतिम सुंदर रचना
ReplyDeleteखुपच छान ताई
ReplyDeleteSundar bhavnik rachna...👍👌✍️🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteThanks to all my friends 🙏
ReplyDeleteसुंदर लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDelete