मनोहर आणि अनघाची 'गार्गी' ही एकुलती एक मुलगी. ८ , ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेली गार्गी अर्थात घरात सर्वांची लाडकी होती. आजी-आजोबांची तर जणू दुधावरची साय. गार्गीच्या येण्याने सारे घर कसे आनंदून गेले होते. गार्गी चे हवे-नको ते सर्व लाड आजी आजोबा पुरवित होते. आजीची अंगाई ऐकल्याशिवाय गार्गी झोपतही नसे. मनोहर आणि अनघा कामाला गेले की छोटी गार्गी आणि आजी आजोबा घरात खूप धमाल करीत. कधी कधी गार्गी आईची ओढणी गळ्याभोवती
घेऊन खांद्यावर तिची पर्स घेऊन घरभर मिरवीत असे. आजी आजोबांना तिचे खूप कौतुक वाटत असे.
गार्गी हळूहळू मोठी होत होती तसा तिचा हट्टीपणा देखील कमालीचा वाढला होता. एखादी गोष्ट हवी असली की ती तिला पाहिजेच. आजी आजोबाही तिला लगेच आणून देत असे. अनघाला त्यामुळे कधीकधी खूप राग येत असे. ती सासूबाईंना मग म्हणत असे, "तुम्ही गार्गीला खूप लाडावून ठेवले आहे आणि त्यामुळेच ती हट्टीझाली आहे. पुढे जाऊन खूप अवघड होईल." त्यावर सासुबाईंचे ठरलेले उत्तर असायचे," अगं पोरीची जात, आज नाही तर उद्या ती आपली सासरी निघून जाणार म्हणून आता तिचे लाड केले तर काय हरकत आहे. "अनघा आणि मनोहर त्यावर काहीच बोलायचे नाही.
गार्गी पाच ते सहा वर्षांची असताना अनघा व मनोहर तिला सर्कस पाहण्यास घेऊन गेले होते. सर्कस पाहताना गार्गीला खूप मजा येत होती. सर्कस मधील हसवणारा जोकर, उंच उंच झोके घेणारी माणसं, सर्कशीतील प्राण्यांचे खेळ पाहून गार्गीला खूप गंमत वाटत होती. सायकल चालवणारा हत्ती जेव्हा गार्गीने पाहिला, तेव्हा गार्गी "तो हत्ती पाहिजे" असा हट्टच करू लागली. आई-बाबांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण गार्गी काही केल्या ऐकेना. मग अनघा व मनोहरला नाईलाजास्तव गार्गीला घरी घेऊन यावे लागले.त्या हत्ती साठी गार्गी रात्रभर रडत राहिली. आजी-आजोबांनीही
तिला खूप समजावले. शेवटी रडत रडतच गार्गी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी आजोबांनी गार्गी साठी खेळण्यातील चालणारा हत्ती आणून दिला, तेव्हा कुठे गार्गी शांत झाली.
गार्गी शाळेत जाऊ लागली होती. तिला अभ्यासाचा खूप कंटाळा येत असे. खेळण्याकडे तिचा कल जास्त असे. शाळेतील डायरीमध्ये कायम गार्गीस तिच्या शिक्षकांनी रिमार्क दिलेला असे, कधी गृहपाठ अपूर्ण, तर कधी पुस्तक आणले नाही याकरिता , तर कधी वर्गात शिकवत असताना बडबड करते या कारणाकरिता.
शाळेत महिनाअखेरीस अनघा व मनोहर मिटींगला गेले की, गार्गी बाबत तक्रारी ऐकून दोघांना खूप काळजी वाटत असे.
गार्गी आता पाचवी इयत्तेत होती आणि घरापासून शाळा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने गार्गी शाळेत मैत्रिणींसोबत चालत जात असे. गार्गीची परीक्षा सुरू होणार होती. पण गार्गी मात्र अभ्यास काही करत नसे. तिच्या खूप मागे लागून आजी गार्गीला अभ्यास करण्यास बसवत असे. अभ्यासातील प्रगतीत गार्गी जेमतेमच होती. उद्या गार्गीचा इंग्रजीचा पेपर होता म्हणून अनघाने तिचा थोडा सराव घेतला. दुसऱ्या दिवशी अनुभव मनोहर कामाला गेल्यानंतर आजीने गार्गीला नेहमीपेक्षा लवकर उठवले. आज गार्गी चा पेपर होता गार्गी ची शाळा साडेबारा वाजता भरत असे. आजीने गार्गीस
नाश्ता दिला, तिचा डबा दप्तरामध्ये ठेवला आणि आजी म्हणाली, "गार्गी आज तुझा पेपर आहे. मी तुला शाळेत सोडविण्यास येते." पण गार्गीने नकार दिला. ती आपल्या मैत्रिणी बरोबर शाळेत जाण्यास निघाली.
शाळा भरली, तिच्या शिक्षकांनी सर्वांना पेपर लिहिण्यास दिले पण गार्गी मात्र शाळेत आली नव्हती. शिक्षकांनी नेहाला गार्गी विषयी विचारले तेव्हा नेहा म्हणाली, "मॅडम गार्गीने मला पुढे जाण्यास सांगितले.
म्हणून मी एकटीच शाळेत आले." अर्ध्या तासानंतर गार्गी वर्गात आली तेव्हा तिच्या शिक्षकांनी तिला उशिरा येण्याचे कारण विचारले आणि त्या गार्गी वर जवळ जवळ ओरडल्याच. गार्गी भीत भीत म्हणाली, "मॅडम नेहा आणि मी शाळेत येत होतो तेव्हा आमच्या शेजारील सोसायटीतील आजी मला झाडाखाली बसलेल्या दिसल्या. चेहऱ्यावरून त्यांना बरे नाही असे मला वाटले. मी त्यांना तसे विचारल्यावर कळले की त्या देवळातून घरी चालल्या होत्या पण चक्कर आल्याने त्या झाडाखाली
बसल्या होत्या. मला त्यांचे घर माहित होते म्हणून मी त्यांना त्यांच्या घरी सोडवून आले आणि त्यामुळेच मला शाळेत येण्यास उशीर झाला." गार्गीने सांगितलेले ऐकून शिक्षकांना गार्गी चे खूप कौतुक वाटले. त्यांनी गार्गीस
पेपर देऊन तो सोडविण्यास सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळीच गार्गीच्या शिक्षकांनी अनघाला फोन करून शाळेत येण्यास सांगितले. अनघा मनातून अस्वस्थ झाली. 'शिक्षकांनी का बरे बोलावले असेल शाळेत?' असा प्रश्न अनघास पडला. अनघा त्या विचारातच गार्गीच्या शाळेत गेली. शिक्षकांनी सगळा घडलेला प्रकार अनघास सांगितला. आणि गार्गीला पुढे बोलावून सर्व मुलांना टाळ्या वाजवण्यास सांगितले. त्यांनी गार्गीचे खूप कौतुक केले आणि शाबासकी दिली. हे सर्व अनघास अनपेक्षित होते. आपल्या लेकीचे झालेले कौतुक पाहून अनघाचे डोळे पाणावले तिने गार्गीस कडकडून मिठी मारली. कारण आज गार्गीने खूप चांगले काम केले होते. आजी-आजोबांना व तिच्या वडिलांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनाही गार्गीचा खूप अभिमान वाटला. गार्गीने सर्व पेपर सोडवले आणि तिला बऱ्यापैकी मार्कही मिळाले. 'आपली गार्गी खूप हुशार नसली तरी
तिच्यात चांगुलपणा आहे,' या विचाराने मनोहर व अनघा दोघेही सुखावले.
खूप खूप मस्त रचना
ReplyDeleteखूपच छान कथा... बोध ही छान आहे...👌👌👌👍👍👍
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिली गार्गीची कथा . केवळ माणसाची हुशारी च माणसाला घडवू शकत नाही तर त्याचबरोबर माणसाच्या अंगी चांगुलपणा असणं ही गरजेचं असतं . खूप सुंदर बोध मिळाला .
ReplyDeleteअप्रतिम रचना ताई
ReplyDeleteछानच लिहिली कथा ✍️✍️✍️👌👌👏👏
ReplyDeleteवाह वाह खूप खूपचं सुंदर बोधकथा आहे
ReplyDeleteखरचं फक्त अभ्यासात हुशार नसलेल्या गार्गीचे मन खूप छान होतं
खूपच छान कथानक सादर केलय.
Deleteगार्गी चे कौतुक करावे असेच ती लागली.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Thanks to all my friends 🙏 for ur precious
ReplyDeleteComments.🙏🌹🌹🌹
खुप सुंदर कथा...सुरेख शब्दांकन...हुशारीसोबतच माणुसकी असणही गरजेचचं...हे छान अधोरेखित केलय.. प्रेरणादायक कथा...👌👍💐🍫
ReplyDeleteखूप सुंदर कथा...👌👍🍫✍️
ReplyDeleteसुंदर कथा लेखन 👌👌👌
ReplyDelete