माणसाला कधी कोणत्या गोष्टीचे वाईट वाटेल ते सांगता
येत नाही. दुसऱ्यांची झालेली प्रगती पाहूनही माणसाला रुचत नाही. तो माणसाचा स्थायी स्वभाव असतो. अगदी थोडी माणसे असतात ,जी दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधतात . नाहीतर हिणवायला, टीका करायला माणूस सदैव पुढेच असतो. पण एका अर्थाने ते चांगलेच असते . ते म्हणतात ना ' निंदकाचे घर असावे शेजारी '
कारण एक तर निंदा केल्याने आपल्याला आपल्यातील
कमतरता लक्षात येते , कोणी कितीही काही बोलले तरी
आपण आपल्या मताशी ठाम राहण्यास ह्या टीका च
कामी येतात. लोकांनी केलेल्या टीका आपल्याला जीवनाकडे सखोल दृष्टीने पाहण्यास प्रोत्साहनच देत असतात.
आता हेच पाहा ना क्रिकेटची आपली टीम खेळात
जिंकली की सर्व खेळाडूंचे तोंडभरून कौतुक होते, त्यांना
वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. पण हीच टीम हरली की
मात्र लोक त्यांना शिव्या घालतात, कधी कधी अगदी
त्यांचे नुकसान होईल असेही वागतात. पण म्हणून जर
ते खेळाडू खेळलेच नाही तर मग पुढे त्यांचं भवितव्य
कसे होईल, देशाचे नाव कसे पुढे नेता येईल?
म्हणून लोकांचे बोलणे कधीच मनाला लावून घ्यायचे
नाही. लोक काय, दोन्ही बाजूने बोलणारे असतात. जे झालं ते तिथेच सोडायचं आणि पुढील वाटचालीस आरंभ
करायचा. त्याकडे दुर्लक्ष करायचे. पुन्हा नव्या जोमाने
आपण कशाप्रकारे आणखी चांगले काम करू शकतो हाच विचार मनात ठेऊन पुढे पाऊल टाकायचे.
हा काय म्हणेल?, त्याला काय वाटेल, लोक नावं ठेवतील, असे सारे विचार दूर सारायचे कारण शेवटी
जे काही करायचे, भोगायचे असते ते आपल्यालाच असते.
मग इतरांसाठी एवढा विचार का करायचा?
कुढत राहण्यापेक्षा लढत राहा , मार्ग आपोआप सापडेल.
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम, सकारात्मक दृष्टिकोन मांडलाय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete