Wednesday, 17 November 2021

ह्या मनाला काही कळत नाही !



'मन' म्हणजे नेमकं काय ! त्याला विशिष्ट आकार नसतो, रूप नसतं पण प्रत्येकात ते अपरिमित असतं. मन खूप चंचल असतं ते क्षणात इकडे तर क्षणात अत्यंत दूर गेलेलं असतं. एका क्षणात माणसाच्या मनात अगणित विचार चमकून जातात. या मनाचा कधीही ठाव लागत नाही.
           मन म्हणजे आपल्या शरीरातील आत्मा व पचेंद्रियांतील एक महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे कधी मन खूप आनंदित असते तर कधी मन दुःखी, तर कधी
विस्मयचकित, तर कधी भयग्रस्त, कधी निराश मन होऊन जाते. कधी मन विनाकारणच बैचेन होते.
          अशा ह्या मनाला काही गोष्टी रुचत नाही. कोणी केलेला अपमान सहन होत नाही, तेव्हा मन पेटून उठते. लहान मुलांचंच पाहा ना, त्याला एखादी गोष्ट करू नकोस
असे म्हटल्यावर, ती गोष्ट ते मूल हमखास करणार. त्याच्यातील जिज्ञासा त्याला तसे करायला भाग पाडते. सतत नाविन्याचा शोध घेत असते मन.
       आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी मनाला कळतात पण वळत नाही. कोणी कितीही सांगितले, समजावले तरी मनाला त्यांचे म्हणणे पटत नाही. कारण मनाचा तसा निग्रहच झालेला असतो. आपलं मन आपल्याला हवं तसेच वागते. ते चूक की बरोबर ह्या पलीकडे ते गेलेले असते. मनाची अशी अवस्था आपल्यालाच समजत नाही. ' करू की नको करू, करून पाहायला काय हरकत आहे, नाही केलं तर काय
होईल?, मीच का बरे करू!, कशासाठी करू, कोणासाठी करू,' असे अनेक प्रश्न एकाच वेळी या मनात चमकून जातात.
          जर ज्येष्ठांनीही छोट्यांच्या मनाचा विचार केला, त्यांना समजून घेतले, परस्परांशी विचारांची देवाण-घेवाण केली तरच दोन पिढीतील अंतर मिटण्यास मदत होईल आणि कोणी काहीही सांगितले तरी मन स्थीर राहिल, भरकटणार नाही. मनाला योग्य दिशा मिळेल.
            तसेच मन स्थीर राहावे त्याकरिता आधी हे सर्व विचार बाजूला सारून एकाग्र चित्त व्हावे लागेल. एकाग्र मन होण्यासाठी ध्यान करावे लागेल. ज्यातून मनात सकारात्मकता निर्माण होईल असे संतांचे, थोर व्यक्तींचे साहित्य वाचनात आणावे लागेल. ईश्वरावर श्रद्धा ठेवावी लागेल. मनात भक्तीभाव रुजवावा लागेल. तेव्हा कुठे मन आपले प्रफुल्लित होईल, एकाग्र होईल, मनास प्रेरणा मिळेल. मनाला खूप सारे प्रश्न पडणार नाही. मन सजग राहिल. मग कुणी काही सांगण्याचीही गरज भासणार नाही.

सौ. राजश्री सुहास जाधव.







       


7 comments:

  1. अतिशय सुंदर लेख👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  3. छानच लिहीला आहे लेख ...👌👌✍️✍️

    ReplyDelete
  4. खुप सुंदर विचार... छान लीहीलय...👌👍💐🍫

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय अप्रतिम लेख लिहिला

    ReplyDelete
  6. अतिशय आत्मीयक रचना केलीत.

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...