Friday, 26 November 2021

नको हा परकेपणा



परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात, त्यांचा दृष्टीकोन बदलतो. जी आपली आपली म्हणणारी माणसं असतात ती ही मग परकी होऊन जातात. दुसऱ्यांच्या दुःखात त्यांना आनंद मिळतो.
             सांगायचंच झालं तर आपण वास्तव जीवनात, आपल्या आजूबाजूला अगदी स्वतःच्या आयुष्यातही हा परकेपणा अनुभवत असतो. एखादं एकत्र सुखी कुटुंब असतं, ज्यात आजी,आजोबा, नातवंडं, नणंद, दीर, काका, काकू असे सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने राहत असतात. पण मधूनच बाहेरील व्यक्तीमुळे या सुखी कुटुंबात मिठाचा खडा पडतो. म्हणजे घरातील सुनेच्या
माहेरील व्यक्तींची वाजवीपेक्षा जास्त त्यांच्या कुटुंबात ढवळाढवळ सुरू होते. प्रसंगी ती व्यक्ती त्यांच्या कुटुंबात पाहुणी म्हणून मुक्कामास जाते. घरातील सदस्यांविषयी
त्या सुनेचे कान भरते, खलबते रचते. सूनही त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन मग परिवारातील माणसांबरोबर तुटकपणे वागू लागते. आणि माहेरच्या माणसांचे मन, त्यांच्या आवडीनिवडी सांभाळते. स्वतःच्याच घरात कुटुंबियांना मग संकोचल्या सारखे होते, परके वाटू लागते आणि नात्यांना तडा जातो.
   संपत्तीसाठी, पैशांसाठी कधी कधी सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. मग नात्यात दुरावा निर्माण होऊन परकेपणा येतो. त्यांच्या नात्यातील ओढ, आपुलकी संपून जाते.
भाऊ भाऊ असले तरी एकमेकांची तोंडं देखील पाहत नाही.
         उदाहरण द्यायचे झाले तर नविनच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या वर्गात सुरुवातीला जुन्या विद्यार्थ्यांकडून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. नविन येणाऱ्या विद्यार्थ्याला बाकीचे विद्यार्थी स्वतःचा अहंभाव मिरवत त्याच्या नवखेपणाची वारंवार
जाणीव करून देतात. त्यामुळे त्या नविन मुलासही त्या वर्गात आपण वेगळे, परके आहोत असे वाटू लागते. ही भावना त्याला दुःखी करते. ज्या उत्साहाने त्याने प्रवेश घेतलेला असतो तो उत्साह त्याचा नाहीसा होतो. इतरांबरोबर त्याला नविन मैत्री करायची असते, ओळख निर्माण करायची असते, ते सारे मग राहूनच जाते.
           जर त्या नवख्या मुलाशी मैत्री केली, त्याला समजून घेतले तर त्या मुलालाही तिथे आवडू लागेल. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन तो आणखी जिद्दीने तिथे शिकू शकेल.
         नोकरीच्या ठिकाणीही नविन कर्मचाऱ्यास अशा परकेपणाची जाणीव होत असते. खरे तर इतरांनी त्याला समजून घेतले पाहिजे, त्यांच्या अनुभवाच्या चार गोष्टी त्याला शिकवल्या पाहिजे. जेणेकरून नोकरीच्या ठिकाणी ती नविन व्यक्ती उत्तम काम करू शकेल. त्यांच्या बरोबरीने, मदतीने कामाचा दर्जा उंचावू शकेल.
          माणूस हा त्याच्या वागणुकीतून दुसऱ्याला परकेपणा दाखवून देत असतो. हा परकेपणा माणसाला आतून पोखरत राहतो. तो नात्यांमध्ये कटुता निर्माण करतो.  म्हणून,
          ' नका देऊ वागणूक परकेपणाची
           नाहीतर होईल ताटातूट नातेसंबंधांची
           सांभाळावी सारी नाती ऋणानुबंधांची .....'

  सौ. राजश्री सुहास जाधव.
        


10 comments:

  1. Wow ...!!
    राजश्री जी..🌹
    खूप छान लेख लिहिला आहे.आणि असेच मोठे लिखाण करत रहावे आज Total Words: 1995
    आहेत गूगल नियमानुसार कमीतकमी १०० असावे.असेच लिहिले तर Google adseans लवकरच approval देतील.
    छान आहे सातत्याने लिहित रहावे.👌
    अभिनंदन 🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख.....👌👍✍️🍫

    ReplyDelete
  3. वाहह.. खुप सुंदर लिहीलय..छान लेखनशैली...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. खूप छान लेख लिहिला आहे .
    मोलाचं संदेश दिला आपल्या लिखाणातून नकोच हा परकेपणा ..
    उगाच जीवघेणा

    ReplyDelete
  5. उत्तम लेखनशैली 👌👌👌

    ReplyDelete
  6. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏🙏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...