असावे विचार ते सखोल
न ढळू द्यावा कदापि मनाचा तोल
डळमळता तोल मनाचा
घ्यावे लागतील ऐकुनी
सदैव दुजांचे बोल
त्या परी राखावा
मनाचा समतोल
आहे तो अनमोल
अनमोल ते ज्येष्ठांचे बोल
जे देऊनी जाती अनुभवाचे मोल
आत्मसात करिता अनुभवांचे मोल
कठीण समयी साथ देई ते बहुमोल
बहुमोल ती धरा गोल,
आकाशातील तो चंद्र गोल
मातेच्या हाताची भाकरी गोल
गोल या वर्तुळातील
आपण सारेच अनमोल
अनमोल ह्या साऱ्यांना
जपावं हृदयात खोल
खोल त्या अर्णवातील
जणू मोती शिंपल्यातले अनमोल .....
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर रचना
ReplyDeleteखूप छान 👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteअतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर 👌👌👌👌👌
ReplyDelete