कितीदा सांगायचं रे मना तुला
न द्यावा थारा मिथ्या अहंकाराला
कितीदा समजावयाचं रे माणसा तुला
असंगाशी संग नाही येत कामाला
कितीदा सांगायचं रे लेकरा तुला
न द्यावं अंतर कदापि मायबापाला
कितीदा समजावंयाचं रे पुरुषा तुला
न लेखावं गौण कदापि स्त्री जातीला
कितीदा समजावयाचं रे मानवा तुला
होऊ नकोस कारणीभूत निसर्गाच्या ऱ्हासाला
समजावण्यालाही येतात ना मर्यादा
ध्यानी असू द्यावे हे सदा सर्वदा
भाव असतील जर निर्मळ
तरच होईल जीवन सफल ......
सौ. राजश्री सुहास जधव.
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteखूपच छान..,👌👍✍️🍫
ReplyDeleteखूपच छान अप्रतिमच👌
ReplyDeleteलेखनशैली खूपच छान..👌
खूप खूप शुभेच्छा..🌹
आबा 🙏
सुंदर कविता👌👌
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteखूप खूप सुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete