जन्म घेता मुलीचा
दृष्टिकोन बदले समाजाचा
भडिमार होई बंधनांचा
बालपणी माय म्हणे,
आहेस तू मुलगी
कशाला खेळतेस मग
मोटार गाडी अन् सायकली
खेळ तू बाहुलीसवे आपली
कसे जगावे, कसे राहावे,
काय पहरावे अन् काय खावे
नसे मुलीस स्वातंत्र्य कशाचे
वरि म्हणे, आहेस तू मुलगी
स्मरणात असू दे कायमचे
वयात येता मुलगी, मायबाप म्हणे,
ही तर आहे तुझी खरी कसोटी
नकोस जाऊ कुठेही एकटी
शिकलीस कितीही जरी
चूल अन् मूलच आहे शेवटी
अशीच आहे ही जगरहाटी
हे ब्रह्मांडनायका, प्रणाम तुजला कोटी कोटी
सांग तू मजला, मुलगी म्हणुनी जन्मास येणे
ही काय चूक आहे का मोठी ?
ही तर घोडचूक आहे, भेदाभेद करणाऱ्या त्या समाज कर्मठांची
स्विकारण्यास परिवर्तनाला, तूच आता वाट दाव रे तयांना
सौ. राजश्री सुहास जाधव.
वास्तव लिखाण आहे खूपच छान
ReplyDeleteमुलगी म्हणून जन्माला येणं ही चूक नसुन अहोभाग्य आहे आईवडिलांचं....सुंदर वास्तव लिखाण👌👌
ReplyDeleteअप्रतिमच 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteचिंतनशील काव्य!✍️👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम शब्द रचना..👌👍✍️🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👍
ReplyDelete