कामाशिवाय खरेच पर्याय नसतो. काम केले तर त्याचे फळ मिळते. न काम करता कोणीही आपल्याला काही
आयते आणून देणार नाही. म्हणून नियमित काम करा, स्वस्थ राहा, मस्त राहा.
अगदी सामान्य गृहिणीचेच पाहा ना, घरातील सर्वच
कामे तिला पाहावी लागतात, नोकरदार असेल तर मग
ती कामे आणखी दुप्पट वाढतात. पण अगदी चातुर्याने
ती स्त्री सर्व नियोजन बद्ध काम करत असते. घरदार सर्व
सांभाळून सर्व कामे ती चोखपणे पार पाडत असते.
काही माणसांना मुळातच खूप अंगात आळस असतो,
काम करायची अजिबात तयारी नसते. सर्व कामं ते रेंगाळत करत असतात. मग पाहता पाहता कामाचा डोंगरच त्यांच्या समोर उभा राहतो. मग त्यांच्या नाकीनऊ येते. सर्व परिस्थिती हाता बाहेर गेलेली असते. अशावेळी
त्यांना अपमान , नुकसान सारे सोसावे लागते.
ही परिस्थिती निर्माण होऊ नये , यासाठी सर्व प्रथम
कोणत्या कामाला प्रथम प्राधान्य द्यायचे ते ठरवावे. कामाची यादी केली तर काय, कोणती कामे करायची आहे , ते लक्षात येते . आजची कामे आजच शक्यतो
करावी, उद्यावर ढकलू नये. ढकलली तरी दुसऱ्या दिवशी ती आपल्यालाच पूर्ण करायची असतात, हे कायम ध्यानात माणसाने ठेवले पाहिजे.
सतत कार्य मग्न राहिले की, नकारात्मक विचार मनात येत नाही. माणसात उत्साह निर्माण होतो. शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. त्याच बरोबर माणसाला हवे ते यश, समाधान, आर्थिक पाठबळ मिळत राहते. म्हणून
सतत काही ना काही काम करत राहायचे.
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर लेखन 👌👍
ReplyDeleteखूप छान लेख.... कामात शिस्तबद्धता हविच...👍👌✍️🍫
ReplyDeleteKhup chan lekh
ReplyDelete