समोरच्याची नसते कुवत
जेव्हा समजून घेण्याची,
तेव्हा नसते गरज काहीच बोलण्याची
ती जागाही नसते मन मोकळं करण्याची
बोलावे तिथे, जिथे असते
आपल्या बोलण्याला किंमत ,
त्यासाठी धरावी लागत नाही मनात हिंमत
प्रांजळपणाने बोल ते बोलावे अन्
मन ते आपुले तिथेच मुक्त करावे
हीच तर आहे खरी नात्यातील गंमत
जो असेल पाठीशी सर्वदा,
त्याच्याशी बोलून पाहा एकदा
बोलल्याशिवाय समजणार नाही
मन मोकळे ते होणार नाही ....
सौ. राजश्री सुहास जाधव.
मनाचा मनाशी संवाद....👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteसुंदरच 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteVva khup sundar apratim rachana
ReplyDelete