एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली तर आपल्या तोंडून सहज हे शब्द उच्चारले जातात. ' हे वेळेवर घडायला हवं होतं, किंवा उशिरा का होईना आपल्याला कळायला हवं होतं '. खरे तर असे वक्तव्य
करून काहीही उपयोग होणार नसतो तरीही माणूस
असे बोलून स्वतःचे समर्थन करत असतो .
जन्मास येणे आणि जाणे , हे जसे आपल्या हातात
नसते तसे घडणाऱ्या गोष्टी ह्या घडत असतात. त्याला आपण कोणीच रोखू शकत नाही. फक्त आपण प्रामाणिक
पणे आपल्याला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी कठोर
प्रयत्न केले पाहिजे. एक ना एक दिवस गोष्टी आपल्या मनासारख्या नक्कीच घडत जातील. उशिरा का होईना
आपल्या प्रयत्नांना यशही मिळेल . जर नाही मनासारखे
काही घडले तर खचून न जाता , ते माझ्यासाठी नव्हतेच असे समजून पुन्हा वेगवेगळ्या वाटा शोधा. एक वाट जरी
बंद झाली तरी दुसऱ्या अनेक वाटा आपल्यासाठी खुल्या
असतात. फक्त कशाप्रकारे वाटचाल करावी हे आपण
मनाशी पक्के केले पाहिजे.
अगदी सांगायचे झाले तर आपल्या प्रेमभावना जेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगणे हे काही ना काही कारणामुळे राहून जाते. मनातल्या गोष्टी मनातच राहतात.
पुढे काळ जसा सरकतो तसा ती व्यक्तीही आपल्या पासून दूर गेलेली असते आणि आपणही आपल्या दुनियेत
रमून गेलेलो असतो. तेव्हा दोघांचे आयुष्य काही थांबलेले
नसते. ते त्याच्या त्याच्या परीने सुरळीत चालू असते आणि
अचानक एके दिवशी जर दोघांची भेट झाली तर पुन्हा त्या
भावना, आठवणी जागृत होतात , मन कुठे तरी म्हणत असते की ,' माझे प्रेम तुला कळायला हवं होतं ' .
ह्या गोष्टीचा विचार करून खरे तर काहीच उपयोग
नसतो कारण आता त्यात बदल घडणे शक्य नसते. इतके
दिवस आपण सुखीच आयुष्य जगत असतो ना ! मग वाईट वाटून घेण्यात काहीच अर्थ उरत नाही.
जे घडायचं असतं ते घडणारच असतं, जरी कळलं तरी त्यातून साध्य ते काय होणार असतं ? हे लक्षात ठेवले तर माणूस त्यातच गुरफटून जाणार नाही.
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर वैचारिक लेखन!✍️👌👌👌
ReplyDeleteसुंदर लेखन...✍️✍️
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना
ReplyDeleteअप्रतिम👌
ReplyDeleteखूपच छान...!
आबा
🌷👍
खूपच छान पण किमान १००० शब्दात रचना केली पाहिजे तरच पुढे फायदेशीर ठरेल..👍
ReplyDeleteआबा
🌷
खूपच छान लेख लिहिला आहे ..खूप छान मुद्दे मांडले
ReplyDelete