वरवर पाहता सौंदर्यांची व्याख्या म्हणजे ' गौरवर्ण, सुंदर मुखडा, कमनीय बांधा, सुंदर घारे डोळे ' साधारण हेच समाजात वावरताना गृहीत धरले जाते . आपणास कोणी
सुंदर म्हटले तर ते कोणाला आवडणार नाही. परंतु सुंदर दिसणे आणि सुंदर असणे ह्यात खूप फरक आहे.
बाह्य सौंदर्याला भुलून बरेच वेळा माणसाच्या पदरी निराशाच येते. कारण एखादी स्त्री खूप सुंदर असेल किंवा एखादा पुरुष, हो एखादा पुरुष खूप सुंदर असेल ( सौंदर्य फक्त स्त्री पुरते विशेषण आहे का , पुरुषही राजबिंडा ,सुंदर असतोच की ! ) तो दिसण्यास सुंदर असेल पण त्याचे चारित्र्य हे वाईट असेल म्हणजे तो व्यभिचारी असेल तर त्या सौंदर्याचा काय उपयोग?
तसेच जी स्त्री जर कपटी, कारस्थानी असेल तर ती कितीही सुंदर असली तरी तिच्या त्या सौंदर्याला काहीच
अर्थ उरत नाही.
खरे सौंदर्य शोधले तर अगदी कशात ही दिसेल. फक्त ते दिसण्यासाठी तशी नजर हवी. सौंदर्य तर आपल्या सभोवतालचा परिसर रोज स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांच्या हातात असते, सौंदर्य तर कुंभार जेव्हा मातीला आकार देऊन सुबक असे घडे, पणत्या आणखी सुंदर अशा वस्तू बनवतो , तेव्हा खरे सौंदर्य तर त्याच्या हातात असते.
एक शिक्षक जेव्हा आपल्या विद्यार्थ्यास जितक्या तळमळीने शिकवत असतात , घडवत असतात ,त्या
शिक्षका मध्ये हे कलेचे सौंदर्य दडलेले असते कारण शिकवणे ही सुद्धा एक कला आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात खरे सौंदर्य आहे. प्रेमाने खाऊ
घालणाऱ्या मातेच्या वात्सल्यात आपणास सुंदरता सहज दिसून येईल .
बाह्य सौंदर्य हे काळानुसार ओसरते. पण हृदय आपले जर निर्मळ,प्रेमळ, मन निरागस असेल तर ते खरे
सौंदर्य आणि तेच निरंतर राहते. अंतरंग सुंदर असेल तर ती सुंदरता खरी होय. जिथे कायम मधुर वाणी , मितभाषी , परोपकार यांचे वास्तव्य असते आणि ते परिपूर्ण असे सौंदर्य म्हणता येईल.
जेव्हा आपल्याला आपल्यातील हे सौंदर्य गवसेल तेव्हा खरा आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन
बदलेल आणि खऱ्या अर्थाने आपला जीवन प्रवास सुरू होईल .
सौ. राजश्री सुहास जाधव.
व्वाऽ....!
ReplyDeleteअप्रतिम खूपच छान..👌
आबा
🙏
सुंदर लिहिलंय ,चांगलं लिहिणं हे ही सौंदर्यच आहे.....👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख
ReplyDeleteसुंदर लेखन 👌👍👌
ReplyDeleteसौंदर्य म्हणजे काय? हे सांगणारा अप्रतिम लेख!✍️👌👌👌
ReplyDelete