असेल जर मनात जागा खास
ढळत नाही कदापि विश्वास
दर्पणासम नाजूक तो
ठेवावा जपुनी त्यास ....
न व्हावा भग्न तो दर्पण
भग्न त्या तुकड्यांसम
तुटलेल्या भरवश्यासही
न मिळे कसलेही समर्थन ....
विश्वासास ठरे तोच खरा पात्र
जो घेई समजून आपणास
येऊ दे कितीही अडचणी जीवनात
जाऊ देणार नाही तडा आपुल्या मनास ...
भग्न त्या दर्पणाचे छिन्नविछिन्न ते तुकडे,
जोडता ते घायाळ करी बोटांना
तुटलेला भरवसा तो
घायाळ करी माणसांना ....
ठेवावा दृढ विश्वास मनात
नात्यांना नवसंजीवनी देण्यास
करावा सातत्याने हा प्रयास
ठेवावा विश्वास विनासायास....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
अतिशय सुंदर शब्दसौदर्य...!✍️👌👌👌
ReplyDelete👌
ReplyDeleteविश्वास..................
ReplyDeleteहा किती छोटा शब्द आहे.................
वाचायला सेकंद लागतो...................
विचार करायला मिनीट लागतो............
समजायला दिवस लागतो...........
आणि.......
सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागते.........