Tuesday, 25 January 2022

आनंदाचं झाड



झाड, लावीन मी आनंदाचं झाड
जपेल त्यास मी अलवार
रूजवेल त्यात बीज नात्यांचं,
येईल बहरुनी ते डेरेदार ....

आनंदाच्या झाडास या,
घालीन मी प्रेमाचं खतपाणी
ठेवीन गुंफुणी नात्यांना या,
करीन सदैव मधाळ ती वाणी ....

करण्यास आनंद तो द्विगुणित
राहिन सदैव मी प्रफुल्लीत,
अनुभवण्या परस्परांसवे सोहळे आनंदाचे
जाईन मी आनंद तो पखरीत ....

आनंद द्यावा, आनंद घ्यावा
ना ठेवावा कदापि द्वेषभाव
गाठण्यास अनुभूती परमानंदाची,
घ्यावा लागेल आनंदाचा ठाव ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


5 comments:

  1. आनंदाचे झाड... सुंदर कल्पना!✍️👌👌👌

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. खूप मस्त रचना अप्रतिम..🌹❤️❤️👌👌🌿🌺💗

    ReplyDelete
  4. वाहह...खुपच सुंदर शब्दांकन , अप्रतीम रचना...👏👏👏💐🍫

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...