कुणी काही का सांगेना
नव्या पिढीला मोठ्यांचं समजावणं रुचेना
अन् जुन्या पिढीला त्यांची मतं पटेना
स्वतःचा हेका दोघेही काही केल्या सोडेना
मनातलं दोघांच्या काही केल्या उमगेना
दुफळी दोघांतील ती मिटेना
म्हणुनी सोडुनी हेका दोघांनी
करावी परस्परांतील विचारांशी हातमिळवणी
घ्यावे एकमेकांस सांभाळुनी
करावी सुखाची पायाभरणी
मग होईल हर्ष मनोमनी ........
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर 👌👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteनव्या जुन्या पिढीत सुसंवाद हवा
ReplyDeleteअप्रतीम रचना...जनरेशन गॅप तर असतोच..तो कमी झाला तर फारच छान...👌👍💐🍫
ReplyDeleteसुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟
ReplyDeleteखुपच सुंदर रचना...
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!👌👌👌
ReplyDelete