प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या तरी नाते संबंधात बांधलेला असतो. आई, वडिलांचे, मुलांचे भावा-बहिणींचे, दिर- नणंदा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर- प्रेयसी, पती-पत्नी, सहकारी, ही सर्व नाती आपणास पाहायला मिळतात. अशी नाती आपल्याला प्रेरीत करत असतात. त्यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण होतात. ही नाती आपल्याला कधी सल्ले देतात, कधी मदतीचा हात पुढे करतात, कधी भांडतात, रुसतात, कधी हसवतात, कधी रडवतात. ह्या नात्यांमध्ये माणूस स्वतःला गुरफुटून घेतो. परिणामी माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट परिणामांना सामोरे जावे लागते.
ह्या साऱ्या नात्यांहूनही वेगळी अशी नाती असतात. ती शोधून पहिली तर ती आपल्याला आजुबाजूस, सर्वत्र आढळू शकतात. पण तशी दृष्टी पाहिजे. अंतर्मनातून अशी नाती ताडता आली पाहिजे.
खरे तर प्रत्येक माणसाने माणसाशी माणुसकीचे नाते निर्माण केले पाहिजे. ते नाते अनामिक असले तरी त्याची ओढ कायम ठेवली पाहिजे.
ही सृष्टी, हा निसर्ग, भूतलावरील प्राणी-पक्षी, चराचर आणि ह्या सर्वांचा कर्ता करविता तो ईश्वर, ह्या सर्वांशी आपण एका अनामिक नात्याने जोडलेले असतो.
पहाटेच्या रम्य प्रहरी, निसर्गाच्या सान्निध्यात, पक्ष्यांच्या सुमधूर किलबिलाटाने माणसाला सुंदर अनुभूती प्राप्त होत असते. तसेच नित्य ईश्वर स्तवनात त्याला आत्मसुख लाभत असते. एक प्रकारे माणसाचे एक अनामिक नातेच या सर्वांशी जोडले जाते. म्हणूनच सकाळ, दुपार, संध्याकाळ झाली, हे माणसाला, प्राणी-पक्ष्यांनाही बरोबर समजते व त्यानुसार मग सर्वजण आचरण करतात.
अगदी उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या घरातील पाळीव प्राणी, पक्ष्यांविषयी आपल्यात खूपच प्रेमभाव निर्माण झालेला असतो. त्यांच्याशी नकळतपणे आपले नाते निर्माण होते. शेतात राबणाऱ्या बैलांविषयी शेतकऱ्याचे दृढ नाते तयार होते. ह्या नात्याला कुठलेच नाव नसते. त्यांना काही दुखापत, इजा झाली की आपला जीव कासावीस होतो. आपण त्या प्राण्यांना पोटच्या
मुलाप्रमाणे जपतो.
आपल्याला ठाऊकच आहे की, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर कवी मन जागृत होते. त्यांना निरनिराळ्या कविता, रचना स्फुरतात, लिहिण्याची प्रेरणा मिळते. ही सारी किमया घडते कारण माणसाचे निसर्गाशी असलेल्या
अनामिक नात्यामुळे.
शोधता अशी अनामिक नाती
तोषविती मनास किती !
अलवार जतन करा ती.....
सौ. राजश्री सुहास जाधव.
नात्यांचा एक अनोखा प्रकार सांगितलास. खुपच छान 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteखुप छान राजश्री👌🏻🌹
ReplyDeleteनात….. म्हणजे काय….
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.....
आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये........
भक्कम लावलेला जीव म्हणजे नात 👍🏻👍🏻
अनामिक नात्याचा गोडवा खूप छान शब्दात वर्णन केल .
ReplyDeleteखूपच छान लेख लिहिला ...अशी अनामिक नाती खरच कायमस्वरूपी जपायला हवी .
🌺🌺🌹🌹खूप खूप मस्त रचना अप्रतिम..सुंदर..💗💗🌿🌿👌👌👌🌺🌹🌹🌹🌹🌺🌺👌🌿नात्यांचा गोडवा खूप छान सुंदर
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌👌🍫🍫🙏🙏
ReplyDelete