Wednesday, 17 November 2021

गैरसमज सारा.....



'एक क्षण ही तुजवीण कसं राहायचं'?...
गैरसमज असे सारा,
नाही अडत कोणाचे कोणा वाचुनी
आहे जीवनाची हीच तऱ्हा
जन पळभर म्हणतील हाय हाय ..
मी जाता राहिल कार्य काय?
आहे हा मूलमंत्र खरा
म्हणुनी फाटलेल्या नशीबास ना कोसायचं...
साधण्याचा प्रयत्न करत राहायचं ...
प्राक्तन ते भोगायचं ....
नशिबाला ना कोसायचं.....
' येईल एक दिवस माझाही '
ठरवून असं लढायचं ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


6 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर शब्द रचना 👌👌✍️✍️

    ReplyDelete
  3. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना ...

    ReplyDelete
  4. सुंदर, सकारात्मक दृष्टिकोन मांडलाय मॅडम!👌👌👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...