Monday, 22 November 2021

शिदोरी



बालपणीच्या गमती जमती
स्मरणात त्या सदैव असती
खोड्या अन् मस्ती करावी किती!
साथ देण्यास असती सखे सोबती
त्यांच्यासवे दिन ते मजेत जाती
उठणे, बसणे, खाणे,पिणे
शिकणे, खेळणे अन् खिदळणे
नित्य हे संगतीनेच असती
लगोरी, लपाछपी अन् डबा एक्सप्रेस
आट्या -पाट्या, विटी- दांडू
खेळ खेळताना न वाटे कधीच भांडू 
परी तंट्याविना खेळात नसे ती जादू 
स्मरण होता बालपणीचे,
लागते सारे मग आठवू
आदर ज्येष्ठांचा, गुरुजनांचा ,
भाव निखळ मैत्रीचा,
नाना तऱ्हेचे खेळ खेळण्याचा
लहान,सान गोष्टीतही संतोष पावण्याचा,
गरिबीतही मनाची श्रीमंती अनुभवण्याचा
आठवुनी सारे वाटे मनासी,
भाग्यवान किती आमुची ती पिढी !
संस्कारांनी अन् ओसंडत्या चैतन्याने
जणू उभारली ती आनंदाची गुढी 
देईल जी संदेश, नविन पिढीला
आधुनिकतेचा चढविला  साज जरी 
जपावी ही संस्कारांची शिदोरी
सुखाचे टाकील माप ती पदरी .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


3 comments:

  1. लहानपणीच्या सुंदर आठवणींची शिदोरी👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम.....खूपच सुंदर आहेत बालपणातल्या आठवणी👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...