सर्वांनाच प्रश्न हे पडत असतात. कधी काही जाणून घेण्यासाठी, कधी दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखण्यासाठी तर ज्यामध्ये नाविन्य वाटते त्याविषयीही आपल्याला खूप सारे प्रश्न पडत असतात. एखाद्याच्या बुद्धीचा कस तपासण्यासाठी देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर कधी विनाकारणच आपल्याला प्रश्न पडत असतात. कधी दुसऱ्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपण प्रश्न विचारत असतो.
हे सारे जरी असले तरी जिथे प्रश्न निर्माण होतात, तिथे उत्तर हे असतेच. पण कधी उत्तर दिल्याने दुसऱ्यांची मने दुखावतात, तर कधी समोरच्याला अपेक्षित असे उत्तर मिळाले की नाते आणखी दृढ होत जाते. ज्याच्याविषयी आपल्याला अंतरातून खूप आपुलकी, काळजी, प्रेम असते. त्याने जर आपल्याकडे दुर्लक्ष केले की मग समोर
खूप प्रश्न उभे राहतात आणि अशा प्रश्नांची उत्तरे माणूस शोधत बसतो. ती उत्तरे जर मिळाली तर समाधान मिळते,नाही मिळाली तर सतत तेच प्रश्न मनात घिरट्या घालत राहतात. अशा वेळी आपणच थोडे समजून
घेतले की एखाद्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही तेव्हा राग लोभाचा प्रश्नच उरत नाही.
लहान मूल फार चौकस असते. त्याच्या भाबड्या स्वभावामुळे ते अनेक प्रश्न विचारत असते त्याची उत्तरे ही आपण दिलीच पाहिजे. त्याला दुर्लक्षित करता कामा नये. कधी लहान मुलाकडूनही अनपेक्षितपणे असा एखादा प्रश्न विचारला जातो, ज्याचे उत्तर देणे आपणास शक्य नसते. पण त्याला न टाळता वेगळ्या पद्धतीने त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण जर दिले तर त्याला ते समजून जाईल.
म्हणून शक्य असेल तर प्रश्नांची उत्तरे आपण आपलीच शोधली पाहिजे, नाही का !
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम लेख
ReplyDeleteवास्तविकता अशीच असावी
प्रश्नां शिवाय उतर नाही आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणच शोधायला हवे..!!
खूपच छान विचार मांडले 👌
🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️
आबा 🙏
खुप सुंदर लेख
ReplyDeleteखूपच छान लेख....👌👍✍️😘
ReplyDeleteखूप छान 👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteव्वा खूप छान लिहिलं ..अप्रतिम लेख अगदी खरं आहे आपल्या प्रश्नाची उत्तरे आपणच शोधली पाहिजेत
ReplyDeleteअप्रतिम👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम लेख लिहिला सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर लेख👌👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDelete