सवयींचा न होता गुलाम
सवयींनाच करा आपुला गुलाम
प्रत्येकासी असती सवयी त्या किती !
न होय त्याची गिणती
सवय ती लेखनाची अन् वाचनाची,
उभारी ती मनाची अन् पडते भर ज्ञानाची
सवय ती मेहनतीची अन् कष्टाची,
शिडी ती हमखास यशाची
सवय ती सतत शिकण्याची,
विकसित होई क्षमता
बुद्धीची अन् प्रगतीची
सवय ती नित्य सुरेल
गीत, संगीत ऐकण्याची,
मिळे पर्वणी ती
मंत्रमुग्ध होण्याची
सवय ती ध्यानाची अन् ईश्वरसेवेची,
गुरकिल्ली होय मोक्षाची
सवय ती नित्य दानाची,
होई प्राप्ती आशीर्वादाची
सवयी त्या असती चांगल्या,
त्यासम सवयी त्या असती वाईट
लोटे माणसासी दुःखाच्या खाईत
सवय लागता वाईट व्यसानांची,
होई अधोगती जीवनाची
सवय ती सतत त्रागा करण्याची,
भंग पावते मग शांती मनाची
सवय ती सतत खाण्याची,
होई हानी शरिराची
सवय ती भांडणं-तंट्याची,
तुटती नाती आपुलकीची
सवय ती आळसाची,
ठेवावी तयारी मग पराजयाची
काय चांगले, काय वाईट,
जोखुनी सारे, वाटचाल
करावी वाटचाल त्या सवयींची....
सौ. राजश्री सुहास जाधव.
चांगली कविता लिहिण्याची चांगली सवय👌👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteखूपच छान रचना...👌👍✍️🍫
ReplyDeletekhup chhan🤘👌
ReplyDeleteछानच 👌👌👌
ReplyDeleteखरंय मॅडम... ✍️👌समर्थ रामदास म्हटले आहे की, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे,वाचित जावे,शहाणे करावे सकळ जन!👍
ReplyDeleteजय जय श्रीराम!🌹🙏🙏🙏
खुप सुंदर, प्रेरणादायक रचना, सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteKhup chan poem lihili savayiche mahtv chan sangitle
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete