Tuesday, 23 November 2021

मर्जी



आसमंती झळके चंद्र, तारे
सृष्टीवरीचे जग हे सारे
सारी असे ईश्वराचीच मर्जी रे
दिले तू आम्हा निसर्गाचे दान रे
घेण्यास श्वास मोकळा तूच कारण रे
होऊनी विश्वविधाता तूच आम्हां रक्षिले
परी लालसेपायी दुराचार, भ्रष्टाचार,
निसर्ग ऱ्हास, स्त्री शोषण करुनी
स्वत्वाचे स्तोम मानवाने माजवले
अन् ईश्वराच्या रागास कारण झाले
अवहेलना सृष्टीची पाहुनी
ईश्वर तो गहिवरे
मर्जीतुनी त्या ईश्वराच्या
मानव उतरे
मग दावुनी कोप सृष्टीचा
धडा शिकवला ईश्वराने मानवाला

सौ. राजश्री सुहास जाधव.


11 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर काव्य👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना...,👍👌✍️🍫

    ReplyDelete
  4. अगदीच खरं....
    सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूप खूप मस्त रचना अप्रतिम...🌹🌹🌺🌺🌺🌿🌿🌺💞💞❤️❤️👌👌सुंदर

    ReplyDelete
  6. मानवाची करणी... सुंदर भाष्य!✍️👌👌👌

    ReplyDelete
  7. वाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...