जिथे , तिथे सारे अफवांचेच सारे पेव आहे .
साऱ्यात या मानव तो भरडत आहे .
डोळेझाक करुनी तेच ते गिरवत आहे.
जाणण्या सत्य, ना कोणी धजावत आहे .
फायदा स्वतःचाच हर एक पाहत आहे.
जीवघेणी ती स्पर्धा आहे.
महासागरात लालसेच्या मानवप्राणी डुंबत आहे.
नेण्यास तरूनी त्यांना, तरबेज नाविकाची निकड आहे .
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असत्य हे, झाले डोईजड आहे.
साऱ्यात या परवड, गरीबाची होत आहे.
खिसे धनिकांचेच भरभरून भरत आहे.
असत्याच्या या सागरात, शोध सत्याचा
कधी लागणार का आहे ?.......
सौ. राजश्री सुहास जाधव.
अतिशय सुंदर लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDelete