असावं आपलं प्रेमाचं गाव
देईल त्याला मी सुंदर नाव
जे घेईल मनाचा ठाव
प्रेमाच्या गावात
नको कोणी दुजा
मी तुझी राणी अन्
तू माझा राजा
जोडीने करू संसार
सुंदर साजेसा
सुंदर त्या गावात
असावा सुंदरसा आरसा
तूच चालवावा पुढे
सौंदर्याचा वारसा
सुंदर त्या गावात
असावा सुंदरसा दरवाजा
थेट हृदयातुनी होईल
तुझ्या नित्य माझी ये जा
अशा या प्रेमाच्या गावास
न लागावी कोणाचीच दृष्ट
नसे ते आम्हा दोघांसाठी कदापि इष्ट ....
अतिशय सुंदर रचना
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली आहे मॅम👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏼👌🏼
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteलईच सुंदर लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDelete