जेव्हा दोन जीव,
अडकले जातात विवाह बंधनात,
तेव्हा राहावे लागते त्यांस वचनात
ठेवावा लागतो संयम जीवनात.....
दोन जीवांची ही रेशीमगाठ,
ठेवावी ती अलवार गुंफून
कितीही येऊ दे अडचणींचे डोंगर,
करावे पार दोघांनीही पुढे सरसावून .....
ध्यानी ठेवावे वचन एकत्र राहण्याचे,
साथीने परस्परांच्या शोधावे मार्ग सुखाचे
न पेरावे बीज मनात शंकाकुशंकांचे
वाताहत होण्यास तेच कारण जीवनाचे .....
दोन जीवांसवे, दोन कुटुंबांचेही ते मनोमिलन,
बांधावी खूणगाठ ही साऱ्यांनी
ठेवावी नाती ती सचेतन,
राखुनी साऱ्यांचा मान परस्परांनी .....
सौ. राजश्री सुहास जाधव.
अगदी बरोबर आहे खूप छान लिहिलंय
ReplyDeleteसुंदर शब्दभावना!✍️👌👌👌
ReplyDelete