करता अत्याचार स्त्रीवरी
जगण्याची आणता नामुष्की
घुसमट होई रे तिची !
कुठे हरवली माणुसकी ?...
नको जाती-पाती, नको द्वेष-भाव
अंगी बाणावा नित्य सद्भाव
आचरणात आणून साऱ्यांनी,
गाठावा हो माणुसकीचा गाव ....
खोटेच अश्रू अन् खोटीच नाती
देखुनी वेदना दुसऱ्याची,
डोळ्यांच्या कडाही ना पाणावती
हे माणसा, ओशाळली का माणुसकी ती ?....
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟🌟🌟🌟
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌
ReplyDelete