दुसऱ्याला दोष देणं असतं किती सोपं !
विचारून पाहा मनास एकदा, का सारखं असं होतं ?
दुसऱ्याच्या चुका दाखवण्यास माणूस असतो तरबेज
येते जेव्हा स्वतःवर वेळ, तेव्हा मात्र बोलणंच खुंटतं .....
एकमेकांना दोष देण्यात का घालवावा वेळ ?
अशाने सांधणार नाही कधीच ताळमेळ
जीवन आहे क्षणभंगुर, आज आहे, उद्या नसेलही
होईल कधीही ते फितूर अन् मनाची वाढेल घालमेल .....
जे असते चांगले, ग्राह्य, ते दिसत नाही कोणाला
होता एखादी जरी चूक, दाखविण्यास ती मात्र,
माणूस नेहमीच पुढे सरसावला
असेच चालू राहते मग दोषारोपाचे अविरत सत्र .....
खरे पाहता दोष नसतो कोणा एकाचा,
करावा सदैव विचार दोन्ही बाजूंचा
मिटवावे मतभेद ते सामंजस्याने,
तरच होईल उत्कर्ष जीवनाचा ......
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूपच छान
ReplyDeleteखुप छान 👌👌👌👌
ReplyDeletekhup chhan
ReplyDeleteएक बोट दाखवून दुस-याला दोष देताना अंगठ्यासह चार बोटे आपणासही खुणावतात: तुझे आधी पहा! पण,आपण नेमके हेच विसरतो.सुंदर लिहिले!✍️👌👌👌
ReplyDeleteअगदी बरोबर 👌👍
ReplyDelete